शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा महाराष्ट्राचा बुलंद आवाज…!
कर्मवीर एन.डी. पाटील यांच्या विचारांचा वारसा चालवत, सामान्यांच्या मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करणे हेच आमचे ध्येय आहे. ग्रामीण शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून घेत डिजिटल साक्षरतेवर आम्ही भर दिला. आर्थिक अडसर असलेल्या जिद्दी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च आम्ही 'लोकसहभागातून' पूर्ण केला आहे.
समाजकारण हेच आमचे राजकारण! सामान्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत असतो. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना मोफत उपचार मिळवून देणे असो किंवा रक्ताच्या एका थेंबासाठी धावून जाणे असो, आमचा कार्यकर्ता सदैव तत्पर असतो. हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कुटुंबांना 'आर्थिक मदतीचा हात' देऊन त्यांना सन्मानाने जगण्याचा मायेचा आधार आम्ही दिला आहे.
स्त्री शक्तीचा जागर, हीच क्रांतीची सुरुवात!" या ब्रीदवाक्याला प्रमाण मानून शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला प्राधान्य दिले आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गटांना केवळ अर्थसाहाय्यच नाही, तर त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आहेत. महिलांच्या अंगभूत कौशल्यांना वाव देत, गृह उद्योगांच्या माध्यमातून हजारो भगिनींना स्वावलंबी बनवून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे.
युवकांचे प्रश्न हीच आमची प्राथमिकता! सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी आम्ही भव्य 'रोजगार महामेळावे' आयोजित करून हजारो तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. बदलत्या काळाची गरज ओळखून आयटी, मॅन्युफॅक्चरिंग आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून 'कौशल्य विकास प्रशिक्षण' देऊन तरुणांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य आम्ही अविरतपणे करत आहोत.
प्रास्ताविक
१८७३ साली जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. ग्रामीण जीवनात खोलवर रुजलेली ही पहिली चळवळ होती. भारतीय शेतकरी कामगार पक्षाला जोतीराव फुले यांच्या या सत्यशोधक समाजाचा वैचारिक वारसा, तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. जोतीराव फुलेंच्या निधनानंतर दशकभर थंडावलेल्या बहुजनांच्या चळवळीला शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाने पुन्हा चालना मिळाली. टिळक व त्यांचे अनुयायी यांनी या प्रकरणी घेतलेली प्रतिगामी, चुकीची, अशास्त्रीय व संकुचित भूमिका तसेच राजकीय शक्तींचे घडून आलेले धृवीकरण आणि बहुजनांमधील आर्थिक स्वहित व दर्जा याबद्दलच्या जागृत्तेकरिता शाहू महाराजांना या चळवळीत पडणे भाग पडले. सामाजिक समतेची प्रतिष्ठापना, अस्पृश्यतानिवारण, कनिष्ठ जातींच्या उन्नतीचे उपक्रम, बहुजन समाजासाठी शिक्षणाच्या सोयी अशा अनेक आघाड्यांवर शाहू महाराजांनी बहुजनांची ही चळवळ चालवली. शाहू महाराजांच्या नेतृत्वाने बहुजनांतील भिन्न जातींच्या चळवळींची सुसुत्रता निर्माण झाली. मोफत वसतिगृह व शाळा-महाविद्यालये यामुळे बहुजन समाजात झपाट्याने शिक्षणप्रसार झाला. त्यातून पुढे आलेल्या तरुण पिढीने बहुजन चळवळीत नवा जोम आणला. सरकारी नोकरी मिळविणे ही मुख्य प्रेरणा असली तरी सामाजिक समता, राजकीय सत्तेत वाटा मिळविणे या प्रेरणाही चळवळीतील काहींच्या सहभागामागचे कारण होते. मराठा श्रेष्ठींबरोबरच परिवर्तन-मूल्यांनी झपाटलेला तरुण वर्गही अग्रेसर होता. या काळात चळवळीची गती, व्याप्ती व ताकत वाढविण्याकरिता शाहू महाराजांची सत्ता अत्यंत उपयुक्त ठरली.

कर्मवीर एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षितांच्या न्यायासाठी अर्पण केले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याचे सहकार मंत्री असताना त्यांनी घेतलेले लोकहितवादी निर्णय आजही मार्गदर्शक ठरतात. कृष्णा-कोयना खोरे पाणी प्रश्न असो वा टोलविरोधी आंदोलन, त्यांनी नेहमीच सामान्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा वारसा देणारे ते एक अजातशत्रू नेतृत्व होते.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून सलग ५४ वर्षे विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे गणपतराव देशमुख हे भारतीय राजकारणातील नैतिकतेचे प्रतीक होते. साधेपणा, निगर्वी स्वभाव आणि लोकांवरील अफाट प्रेम ही त्यांची ओळख. दुष्काळी सांगोला तालुक्याचा कायापालट करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. सत्तेत असो वा नसो, जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास अढळ होता. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक राजकारणाचा आदर्श त्यांनी नव्या पिढीसमोर घालून दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाला दिशा देण्याचे काम भाई उद्धवराव पाटील यांनी केले. मराठवाड्याच्या भूमीत लाल बावटा अधिक मजबूत करण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. अत्यंत अभ्यासू वक्ता आणि कुशल संघटक म्हणून त्यांची ख्याती होती. शोषितांच्या संघर्षाला मार्क्सवादी-लेनिनवादी विचारांची जोड देऊन त्यांनी कष्टकऱ्यांच्या हक्काचा बुलंद आवाज निर्माण केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. पक्षाच्या विचारधारेचा पाया रचणारे ते खऱ्या अर्थाने ‘शिल्पकार’ होते.
विद्यमान सरचिटणीस आणि विधान परिषदेचे माजी सदस्य. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘लाल बावटा’ अधिक मजबूत करणारे धुरंधर नेतृत्व. प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी सभागृहात आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे व्यक्तिमत्व. सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणारे लोकनेते.
पक्षाच्या युवा फळीचे प्रेरणास्थान आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी. पेण-सुधागड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ग्रामीण विकासाचा नवा पॅटर्न राबवला. युवकांचे रोजगार, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणारे आक्रमक वक्ता आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व.
कर्मवीर एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षितांच्या न्यायासाठी अर्पण केले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याचे सहकार मंत्री असताना त्यांनी घेतलेले लोकहितवादी निर्णय आजही मार्गदर्शक ठरतात. कृष्णा-कोयना खोरे पाणी प्रश्न असो वा टोलविरोधी आंदोलन, त्यांनी नेहमीच सामान्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा वारसा देणारे ते एक अजातशत्रू नेतृत्व होते.
विद्यमान सरचिटणीस आणि विधान परिषदेचे माजी सदस्य. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘लाल बावटा’ अधिक मजबूत करणारे धुरंधर नेतृत्व. प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी सभागृहात आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे व्यक्तिमत्व. सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणारे लोकनेते.
विद्यमान सरचिटणीस आणि विधान परिषदेचे माजी सदस्य. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘लाल बावटा’ अधिक मजबूत करणारे धुरंधर नेतृत्व. प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी सभागृहात आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे व्यक्तिमत्व. सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणारे लोकनेते.
विद्यमान सरचिटणीस आणि विधान परिषदेचे माजी सदस्य. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘लाल बावटा’ अधिक मजबूत करणारे धुरंधर नेतृत्व. प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी सभागृहात आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे व्यक्तिमत्व. सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणारे लोकनेते.
आईन्स्टाईनचा E=mc2 हा सापेक्षता सिद्धांत जसा कुठल्याही परिस्थितीत भौतिकशास्त्रातून आपणाला खोडता येणार नाही, त्याच प्रमाणे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य, कला ह्या सर्वातून कार्ल मार्क्सला आपण खोडू शकणार नाही. त्याने दिलेल्या मूलभूत सिद्धांतांचा आत्ताच्या परिस्थितीमधील संदर्भ शोधून मानवी जीवनाच्या सुधारणांसाठी वापर करणं अपरिहार्य आहे, पुढे होईल. तुम्ही पुरोगामी असा, मूलतत्त्ववादी असा, राष्ट्रवादी असा, धर्मवादी असा, समाजवादी असा, भांडवलदारी असा कुणीही असाल राजकीय, आर्थिक, सामाजिक धोरण राबवताना तुम्हाला मार्क्सचा विचार करणं भाग पडेल. तशी चिन्हं आता स्पष्टपणे जगभरात दिसून येत आहेत. प्रत्यक्ष मार्क्सवाद आणि भारतातील मार्क्सवादी साम्यवादाचं स्वरूप, कार्यपद्धती हे एक संपूर्ण स्वतंत्र प्रकरण आहे. भारतात मार्क्सवाद रुजू शकत नाही असा एक अपप्रचार नेहमी केला जातो. वरील विधान पन्नास पंचाहत्तर वर्षांपूर्वी कदाचित योग्य वाटलं असतं. परंतु आजच्या सांप्रदायिक भांडवलशाहीच्या उन्मादिक काळात मार्क्सचा विचार न करणं हे स्वतः वर संकट ओढवून घेतल्यासारखं आहे.